गोवरी गाव वन विभागाच्या डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सोलर कुंपन् योजनेत समाविष्ट करण्याची सभापतींची मागणी
तिरुपती नल्लाला राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील गोवारी येथील शेतकरी दिनकर बोढे हे रात्रौ दीड तासासाठी शेतीतून घरी आले असता त्या दीड तासात राण डुकरानीं त्यांची तब्ब्ल एक एकर कपाशी मोडून जमीनदोस्त् केली सदर घटनेची माहिती मिळताच माजी कृषी सभापतीन्नि वन परीक्षेत्र अधिकारी श्री एल्केवाड यांना दूरध्वनी वरून संपर्क करून घटनास्थळी बोलवून पंचनामा केला आणी सदर नुकसानीची जास्तीत जास्त नुकसान भरपायी द्यावी असे सांगितले.
वेकोली लगत गोवारी, पौनी, चिंचोली, मनोली, बाबपूर, कढोली,चार्ली हे गाव वन परीक्षेत्रा लगतं नसले तरी वेकोली च्या काटेरी झुडपा मुळे वण्य प्राण्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे तरी वन विभागामार्फत वन अच्छादित गावांना जी डॉ श्यामप्रसाद मुखर्जी सॉलर कुंपण योजना राबविल्या जात आहे ती योजना ह्या गावांना सुद्धा लागू करण्यात यावी असा प्रस्ताव बनविण्यास उपस्थित अधिकाऱ्यांना सभापतींनी सांगितले व वरिष्ठ स्तरावर स्वतः पाठपुरावा करण्याचे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
या प्रसंगी वन परीक्षेत्र अधिकारी राजुरा श्री एलकेवाड व त्यांची टीम, ग्रामपंचायत सदस्य गोवरी शंकर बोढे, विलास लोहे, धनंजय लोहे, दिनकर बोढे, उमेश बोढे, सुरज बोबडे आदी शेतकरी तथा लोकमतचे प्रतिनिधी प्रकाश काळे उपस्थित होते.

