वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:- सर्व समावेशक असे भारताचे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. आंबेडकरी जनता आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतो, परंतु जाताना ज्ञानाचा अनमोल असा खजिना आपल्या सोबत घेऊन जातो, त्याचे प्रतिक म्हणून यंदाही पन्नास कोटींची पुस्तक विक्री झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण औचित साधून संविधान मूल्य जपून अॕड. भूषण तायडे, दादाराव नांगरे, बहिष्कृत भारत डिजिटल मिडियाचे संपूर्ण प्रतिनिधी यांनी शिवाजी पार्क परिसरात कायद्याची जनजागृती करत संविधान व अॕट्रासिटी कायदाच्या हजारो प्रती वाटल्या.
आज देशात नागरिकांना मिळालेला न्याय, हक्क, अधिकार संविधानामुळे अबाधित आहे. आपल्या अधिकाराची माहिती प्रत्येक नागरिकांना व्हावी. त्यामुळे मागील अनेक वर्षा पासून संविधानाच्या जनजागृतीसाठी अॕड. भूषण तायडे, दादाराव नांगरे आणि संपूर्ण टीम हे कार्य करत आहे. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण मुंबई येथे चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांना संविधानाचा प्रती आणि अॕट्रासिटी कायदाच्या हजारो प्रतिनिधी वाटण्यात आल्या. याच्या या उपक्रमामुळे सर्वत्र यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

