✒️प्रवीण जगताप हिंगणघाट प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
हिंगणघाट,दि. 6 डिसेंबर:- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संध्या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश गायकवाड मित्र परिवार व सौजन्य आदर्श महिला नागरी पतसंस्था हिंगणघाट कडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका बबिताताई वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
“नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा” या स्वर संगीतातून अभिवादनाला सुरुवात झाली आपल्या मधुर स्वरातून व प्रबोधनातून संपूर्ण जनतेच्या उपस्थितीमध्ये अभिवादन संध्याच्या माध्यमातुन शब्दसुमनाने आदरांजली वाहली. या संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे सादरकर्ते मी होणार सुपरस्टार स्टार प्रवाह फेम गायक राहुल मोरे व सोबत साई स्वरयज्ञ संगीत कला वृंद, हिंगणघाट हे होते.
या संगीतमय अभिवादन कार्यक्रमाचे संचालन महेश मुडे यांनी केले, गायक महेश चौधरी, योगिनी वांधरे, तबला – ढोलक वादक अभयजी झाडे, अक्टोपॅड वादक अतुल तांदूलकर, कीबोर्ड वादक आदित्य खंदारे, साउंड सिस्टीम जितू भगत यांनी केले.
या अभिवादन संध्येला यशस्वीरित्या नियोजन सुरेश गायकवाड, शुभम कोंडागुरले, रसपालजी शेंद्रे, अमित सोगे, निकु रामटेके, वीरेंद्र दुर्गे, अविनाश झाडे, अरुण कांबळे, निखिल उंमरे, मनीश सुनानी, रजत मून, ईशान खंदार, सौरभ पाझारे, प्रवीण जनबंधू, मित्रपरिवार यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348