सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर,दि.10:- आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा या उद्देशाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
विविध शासकीय कामाच्या निमित्ताने नागरिकांची, अभ्यागंताची सतत ये जा सुरू असते. त्यामुळे त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हाचे जिल्हाधिकारी विनय गौडा पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. जिल्ह्यातील इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी यावेळी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

