पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड
पुणे : – तपास पथकाची कामगीरी दिनांक २३/११/२०१२ रोजी २०:१५ वा. सुमारास, हैदराबाद बिर्याणी हाऊस समोर हिंजवडी फेज ३. वा. मुळशी, जि. पुणे येथे पायी चालत जाणाऱ्या फिर्यादी नामे सौ. संगीता मधुकर धुमाळ, वय ५२, रा. धुमाळवाडी, घोटवडे, ता. मुळशी जि. पुणे यांचे मागुन मोटारसायकलवरून येऊन दोन इसमांनी त्यांचे गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचुन चोरून घेऊन गेल्या बाबत गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे व राम गोमारे असे तपास पथकातील अंमलदारांसह दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना एकुण ५२ सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढत असताना, सपोनि सागर काटे यांना त्यांच्या विश्वासु बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, मेगापोलीस सर्कल, फेज ३. हिंजवडी पुणे येथे पल्सर के एमएच१६/सीके ७८९७ वरून हैदराबाद बिर्याणी हाऊस फेज ३. गवारवाडी रोड, हिंजवडी पुणे येथील चैन चोरी मधील इसम मोटारसायकलसह येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने मेगापोलीस सर्कल, हिंजवडी, पुणे येथे आजुबाजुस पाळत ठेऊन पल्सर के एमएच१६/सीके ७८९७ हिचेवरुन आलेल्या इसमास आमची ओळख सांगुन त्याने तेथे असण्याचे कारण विचारता, तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही व स्टाफने त्यास जागीच पकडून त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश वजीर राठोड, वय २२, रा. राहुल तापकीर कचरा प्लान्ट जवळ, गणेश तापकीर वीट भट्टी शेजारी, मुलखेड, ता. मुळशी, जि. पुणे असे सांगीतले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटले त्यास पल्सर मोटारसायकलसह पोलीस ठाण्यास आणुन तपास करता त्याने दाखल गुन्हा हा त्याचा साथीदार नामे अमर राठोड याचेसह येऊन केला असल्याचे सांगुन यातील चोरलेले फिर्यादीचे मंगळसूत्र त्याने सोमपाल नारायण सिंह, वय ३१, रा. हरवर, हार्बर, डुंगारपुर, पाल, निठाऊया, राजस्थान यास विकल्याचे सांगीतले व सदर इसम हा त्याला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगीतल्याने त्यास सापळा रचुन ताब्यात घेऊन दि. ३/१२/२०२२ रोजी ११:५० वा. अटक करण्यात आली. सदर आरोपीकडे दाखल गुन्ह्यातील चोरलेले मंगळसुत्रा बाबत तपास करता ते त्याने अहमदाबाद गुजरात येथे असल्याचे सांगीतलेने अहमदाबाद गुजरात येथे जाऊन सदर मंगळसुत्र जप्त करण्यात आले.
आरोपी नामे आकाश बजीर राठोड, यास पोलीस कोठडीत असताना विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्याने तपास करून तसेच तांत्रीक विश्लेषण करून त्याने त्याचे साथीदार नामे १) विश्रांत नानावत २) मंगल नानावत ३) अमर राठोड यांचे साथीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जबरी चोरी निष्पन्न करून त्यापैकी १४ मंगळसूत्र व २ दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गोमारे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. अंकुश शिंदे तो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो अमर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, मा. श्रीकांत डिसले. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे). सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे तपास पथकाचे प्रमुख सपोनि सागर काटे, राम गोमारे, पोउनि रमेश पवार, पोलीस अंमलदार, बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, अरुण नरके, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत, मपोशि सोनाली डोणे यांनी केली आहे.