प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने श्री मुख्यधिकारी नगर परिषद नागभीड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
नगरपरिषद कार्यालयात आम आदमी पार्टी नागभीड तालुका संयोजक योगेशभाऊ सोनकुसरे तालुका शहर सचिव प्रमोदभाऊ भोयर तालुका संगठण मंत्री सुरेशजी कोल्हे नागभीड शहर संयोजक नानक भाऊ नाकाडे उपशहर संयोजक दिंगाबर भाऊ कनकावार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी समस्या सोडविण्याचे निवेदन सादर केले.
वरील नमूद विषयाच्या अनुषघाने मी आपले लक्ष वेधू इच्छितो की मौज नावखळा येथील नवानगर येथील रहिवासी व ग्रामस्थाच्या सोयीसुविधेच्या दुष्टीने अनेक ठिकाणी विकासकामांची जसे पक्के रस्ते व सिमेंट रोड व नाली सौर प्लांट व इतर अश्या विविध ठिकाणी सोयीची नितांत गरज आहे त्या अंतर्गत जे काम आतापर्यंत झालेले आहे तेही अपुऱ्या अवस्थेत आहे तरी मी आम आदमी पार्टी तालुका सचिव प्रमोद भोयर तसेच समस्त नवानगर नावखळा ना, येथील यांचेकडे आपणास विनंती या प्रमाणे आहे की आपण स्व:ता मौज नावखळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन लक्षपूर्वक येथील पाहणी करावी व योग्य तो निर्णय व उचित कारवाई करून येथील रहिवासी लोकांची समस्या दूर करावी.