दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर , रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे आज बुधवार दिनांक ०७/१२/२०२२ ते सोमवार दिनांक १२/१२/२०२२ पर्यंत क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आले होते. यावेळी १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यानी विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात भाग घेवून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला.
यावेळी विद्यार्थ्यानी लंगडी, कबड्डी, खो खो, रस्सी खेच यासारख्या सांघिक स्पर्धेत व रनिंग, गोळा फेक, रिले १०० मीटर यासारख्या वैयक्तिक खेळामध्ये सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला सर्वांनी स्पर्धा खेळत असताना खेळ भावनेने खेळले व स्पर्धेचा आनंद लुटला. याच बरोबर लहान मुलांनी सर्व लंगडी, १०० मीटर रनिंग, रीले स्पर्धा, पोती उडी, बेडूक उडी यामध्ये सहभागी होवून स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला .
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, खजिनदार बाळासाहेब सावंत, सेक्रेटरी नीलकंठ लांडगे, ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कबड्डी खेळाचे विजेते पद इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यानी मिळवले. तसेच खो खो खेळाचे विजेते पद इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी मिळवले. व वैयक्तिक क्रीडा प्रकारात इयत्ता ८ वी व ७ वी चे वर्चस्व राहिले. अतिशय उत्साहात ही स्पर्धा शाळेत झाली . सर्व शिक्षकांनी यामध्ये संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले.

