संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिती पांढरपौनीच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग चन्ने, माजी सरपंच ग्रा. पं. पांढरपौनी यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून योगेश समर्पित, अध्यक्ष, तेली समाज, चंद्रपूर, केशव शेंडे, भाऊराव वैरागडे, बाबूराव लोखंडे, मधुकर चन्ने, खामोना, मधुकर चन्ने, शंकर चन्ने, ताई वसंता वैरागडे, सदस्य, ग्रा. पं.,पांढरपौनी, नीता खनके, पोलीस पाटील, पांढरपौनी, आनंदराव वैरागडे, तंटामुक्ती अध्यक्ष आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वन करण्यात आले. विध्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी संताजीच्या कार्यावर, विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले. वसंता वैरागडे, प्रकाश पाटणकर, प्रशांत वैरागडे, तुकाराम पोहणे यांच्या मार्गदर्शनात आदित्य वैरागडे, वैभव वैरागडे, रेतन वैरागडे, अनेश खामणकर, कुणाल पाटणकर, गणेश खमनकर, प्रफुल खणके, मधन वैरागडे, नंदकिशोर लोखंडे, सुरेश लोखंडे, संदीप लोहबडे, आशिष मोगरे, पंकज बावणे, परमेश्वर वैरागडे, अजय वैरागडे, आकाश पाटणकर, प्रकाश बाणकर आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्योती वैरागडे यांनी केले. प्रास्ताविक दिनेश चन्ने यांनी तर आभार प्रदर्शन शुभम वैरागडे यांनी मानले. या कार्यक्रमाला पांढरपौनी गावातील तेली समाज बांधवानी सहकार्य केले.

