सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत NSQF (National Skill Qualification Frame work) मार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर व्यवसाय शिक्षण सुरु आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद (मा. शा.) ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथील वर्ग ९वी ते १२ वी चे विद्यार्थी ऑटोमोबाईल या विषयाचे शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रमातून आत्मनिर्भय बनवण्याकर्ता आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण मार्गदर्शन व्हावे मनुन टोयोटो सर्विस केंद्र चंद्रपूर येथे वर्ग ११वी व १२ वी ऑटोमोबाईल विषयाचे व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट घेण्यात आली.
या केंद्राचे शाखा व्यवस्थापक एस. नरेंद्र सर आणि इतर कर्मचारी यांनी मुलांना फोर व्हिलर सर्व्हिसिंग कशी करायची आणि त्याकरता लागणारे उपकरण तसेच फोर व्हिलर मध्ये असणारे भविष्य याबद्दल सखोल माहिती देऊन मुलांमध्ये उत्साह वाढवला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता वाघमारे मॅडम, व्यवसाय शिक्षक गोविंदप्रसाद बंसपाल सर यांचे मुलांना नेहमीच करिअर बद्दल मार्गदर्शन मिळत असून यामुळे विद्यार्थी आनंदात होते.


Good News Publice from you. Please visit my website.