मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- कोणत्याही मंगलप्रसंगी, विवाह सोहळ्यात, किंवा हॉटेलात किंवा इतरत्रही द्वारपाल किंवा इतर कामांसाठी नेमलेल्या कामगारांना स्वराज्याच्या मावळ्यांची वेशभूषा केली जाते. त्याच सोबत येेणार्या पाहुण्यांना मुजरा करणे, किंवा नृत्य करणे अशी कामेही त्यांना करायला लावली जातात.
त्यांनी केलेल्या वेशभूषेतून थेट स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणार्या मावळ्यांचा अपमान होतो, अशी भावना निर्माण झाल्याने नाशिकच्या सिंहगर्जना संस्थेचे शिवप्रेमी प्रीतम भामरे यांनी सहा महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी तसेच, जिथे अपमान होईल अशा ठिकाणी मावळ्यांच्या वेशभूषेला विरोध करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रीतमने अलिकडेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेत याबाबत शासन निर्णय घ्यावा व अशा प्रकारच्या अपमानास्पद वेशभूषेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. चिवटे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

