श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 13 को-ऑपरेटिव्ह बँकांना दंड ठोठावला आहे. हा दंड नियमांचं पालन न केल्यामुळे ठोठावण्यात आला आहे. आरबीआयनं या बँकांवर 50 हजार रुपयांपासून 4 लाखांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर, यांना सर्वाधिक 4 लाख रुपये आणि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बीडला अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे.
वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पाटण नागरी सहकारी बँक, पाटण आणि द तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय यांना वेग वेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नागरीक सहकारी बँक मर्यादीत, जगदलपूर; जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, कोलकाता या सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. नागरीक सहकारी बँक मर्यादीत, रायगड; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड बिलासपूर आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, शहडोल यांनी सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.बँकांनी नियमांचं पालन केलेलं नसल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे आरबीआयने म्हटले.
या सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या दंडात्मक कारवाईचा परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले. या कारवाईमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने कळवले आहे
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348