देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील ग्राम पंचायत ईसासनी परिसरातील भिमनगर झोपड़पट्टीच्या विवेक तेजकांत भालधरे यांनी तामीलनाडूतील तिरूहुलूम शासकीय मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये एमबीबीएस करिता प्रवेश मिळविल्याने त्याचे ग्रामवासीयांनी हिंगणा पंचायत समिती सदस्या सौ. पौर्णिमाताई दिक्षित यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ भेंट देऊन व मिठाई भरवून जंगी स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा राकांपा जिल्हा संगठक सुशील दीक्षित, वरिष्ठ पत्रकार तथा राकांपा जिल्हा उपाध्यक्ष लिलाधर दाभे, सरपंच निलेश उईके, उपसरपंच मिनाताई मेश्राम, स्वप्निल मेश्राम, तेजकांत भालाधरे, सौ.तिलोतमाताई भालाधरे आदीसह गांवकरी नागरिक मोठ्या संख्यानी उपस्थित होते.
विवेकचे वडील तेजकांत भालाधरे हिंगणा औधोगिक क्षेत्रातील खाजगी कंपनीत कामगार असुन आई सौ. तिलोतमा भालाधरे आशा वर्करचे काम करते. घरची आर्थिक परिस्थिति तेवढी खास नसतांना सुध्दा इंजीनियरिंग पदवीधर असलेल्या मोठ्या बहिनीच्या मार्गदर्शनाखाली विवेकने अहोरात्र परिश्रम करून बारावी विज्ञानमध्ये ८९ टक्के गुण प्राप्त करून निट स्कोर ४६० व निट रॅंक ११७३१८ मिळवून तामीलनाडूतील तिरूहुलूम शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस करिता प्रवेश मिळवून मानवाच्या धैयपूर्ती व विजय प्राप्ती करिता आर्थिक स्थिति सक्षम असने गरजेचे नसुन जिद्द व मेहनत अधिक महत्वाची असते हे सिद्ध करून दाखविले. विवेकच्या एमबीबीएसमध्ये प्रवेश प्राप्तीच्या बातमीनी संपूर्ण गांवात आंनदाचे वातावरण पसरले असुन, विवेकवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

