✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि. 13 डिसेंबरला हिंगणघाट पोलीस स्टेशनला गुप्तहेराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, एका अल्टो चारचाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक होणार आहे. अशा माहीती वरुन हिंगणघाट येथे नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक सुझुकी कंपनीची अल्टो चारचाकी मोटरकार क्रमांक एमएच -३४/एए- ०५२० येतांना दिसली असता सदर वाहन चालकास थांबण्याचा ईशारा देवून वाहन थांबवीले असता वाहनामध्ये वाहन चालकाचे बाजुला बसलेला एक इसम वाहनाचा दरवाजा उघडून पळुन गेला. सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमित बळवंत चौधरी, वय ३८ वर्ष, रा. शेगाव (गोठाडे) असे
सांगीतले, तसेच त्यास पळालेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने पळालेल्या इसमाचे नाव हेमंत चौधरी, रा. वरोरा, जि. चंद्रपूर असे असल्याचे सांगीतले.
सदर मोटरकारची पाहणी केली असता वाहनामध्ये देशी दारुच्या शिश्याचे खोके मोठ्या प्रमाणात दिसुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन १) एक सुझुकी कंपनीची अल्टो चारचाकी वाहन क्रमांक
एम.एच.-३४/ए.ए.-०५२० कि. १,००,०००/- रु., २) पाच खर्ड्याचे खोक्यात वेगवेगळ्या कंपनीच्या देशी दारुच्या ९० एमएलच्या ५०० शिश्या कि. १८,०००/-रु., ३) एका प्लास्टीक पिशवीमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या देशी दारुच्या ९० एमएल २७० शिश्या कि.१६,२००/- रु., ४) एक साधा मोबाईल कि.१०००/- रु., ५) नगदी ३१६०/- रु. असा एकुण जु.कि. १,५०,३६०/- रु. चा माल हस्तगत करुन आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप.क्र. १२९६ / २०२२ कलम
६५(अ)(ई), ७७(अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा सहकलम १७७, १८१, १३०, ३ (१) मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोनि. कैलाश पुंडकर यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार मनोज लोहकर, नितीन तोडासे, समिर गावंडे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी केली.

