तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चंद्रपुर जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात बुधवारी दोन महिन्याचे अर्भक सापडल्याने रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
राजुरा उपजिल्हा रुग्णालयात संपूर्ण तालुक्यातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गर्दी बघायला मिळते. पण हे रुग्णालय आता एका नव्या घटनेमुळे प्रकाश झोतात आले आहे. बुधवारला रुग्णालयातील वाॅर्ड नंबर 1 मधील शौचालय चोकअप झाले. त्यामुळे बुधवारी सफाई कामगार साफसफाई करण्यास गेला असता त्याला दोन महिन्यांचे अपरिपक्व अर्भक आढळून आले. लगेच त्यांनी ही माहिती उपस्थित डॉक्टरांना सांगितली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश कुडमेथे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348