✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ज्या नझुल भूखंडाच्या नुतणीकरणाची कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही, अशा सर्व भूखंड मिळकतीची स्थळ पाहणी, मोक्का चौकशी नियुक्त पथकाकडून सुरु करण्यात आली आहे. नझूल भूखंडधारकांनी भूखंड पाहणी दरम्यान मोक्का चौकशीस आवश्यक कागदपत्र, दस्त सादर करुन पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
मोक्का पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून संबंधित नझूल भुखंड धारकास नोटीस दिल्या जाणार आहे. नोटीस मधील दिलेल्या तारखेवर कार्यालयात सर्व दस्तऐवजासह संबंधितांना उपस्थित राहावे लागणार आहे. नझूल क्षेत्रातील नझुल पट्टेधारकांनी मिळकतीचे विहीत मुदतीत नुतनीकरण करणे आवश्यक आहे. परंतु ज्या नझुल मिळकतीमध्ये नामांतरणाची खरेदी विक्री, गहाण खत फेरफार, बक्षीसपत्र, मृत्युपत्र व मृत्युपत्राचे फेरफार अथवा इतर कारणामळे फेरफाराची कार्यवाही झालेली आहे अशाच भूखंडाचे नुतणीकरण करण्यात आलेले आहे.
याशिवाय ईतर अल्प प्रमाणात नझुल भूखंडाचे नुतणीकरणाची कार्यवाही सन 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या भूखंडाचे अद्यापपर्यंत नुतणीकरण करण्यात आलेले नाही, अशा भूखंडाची पाहणी करुन मोक्का चौकशी करण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

