विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:– कोविड -19 महामारी आणि आपत्ती व्यवस्थापन या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, आपले जीवन जेवढे मौल्यवान तेवढेच दुसऱ्यांचे जीवन मौल्यवान आहे. या सामाजिक बांधिलकी तून गरीब व गरजुंना मदत व सहकार्य केलेल्या. व त्यांचे निरंतर सुरू असलेल्या प्रेरणादायी कार्य लक्षात ठेवून विशाल पुरुषोत्तम गोरे (सरपंच नांदूर, पो. खंडाळा, ता. राहाता जि.अहमदनगर )यांना पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विशाल पुरुषोत्तम गोरे यांनी कोविड महामारीच्या काळात अनेक लोकांना मदत केली. गरजू रुग्णांना सहकार्य केलं या ची महती जाणून पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा सन्मान अनेक नागरिकांना उत्तम सामाजिक कार्य करायला प्रेरित करणार असे यावेळी उपस्थित असलेले श्री. रवींद्र बोरसे (ग्रामविकास अधिकारी ) श्री. विठ्ठल ठोंबरे पाटील (पोलीस मित्र संघ संघटक महाराष्ट्र राज्य) आणि नांदूर ग्रामस्थ यांनी केले.

