✒️सचिन पावरा, जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील चाळीसगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीच्या बहिणीने प्रेम प्रकरणातून प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने आपल्याच बहिणीच्या सासऱ्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना मेहूणबारे येथे घडली दगडू वामन खैरनार वय 52 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या मृतकाचे नाव आहे. या हत्या प्रकरणात संशयित आरोपी पळून गेला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहूणबारे ह.मु.तिरपोळे तालूका चाळीसगाव येथील दगडू वामन खैरनार वय 52 वर्ष यांचा मुलगा जगदीश याने तीन महिन्यांपूर्वी गावातील तरुणीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता. याचा राग मुलीच्या भावाला होता. या प्रेम प्रकरणावरून दोन्ही परिवारांमध्ये वादविवाद होवून भांडणे झाली होती. त्यातुन दगडू गढरी व त्यांच्या कुटुंबियास दमबाजी देखील झाली होती.
प्रेम विवाहाच्या वादाची रुपांतर खुनात झाले. दगडू खैरनार आज 16 डिसेंबर दुपारी1 वाजताच्या सुमारास तिरपोळे येथून मेहूणबारे येथे धुळे रोडवरील हायस्कुल समोर असलेल्या रेशन दुकानातून रेशन घेऊन बस स्टँडकडे पायी येत होता. या दरम्यान दादा कोळी यांच्या घरासमोर बहिणीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून संशयित सचिन राजेंद्र चव्हाण याने मोटार सायकलवर येत त्याच्या हातातील धारदार हत्याराने दगडू खैरनार यांच्या मानेवर वार केला. तसेच हत्यार तेथेच टाकून तो पळून गेला. या घटनेची माहिती नातलगांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडु खैरनार हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. गढरी यांच्या नातेवाईकांनी त्यांना मेहूणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348