तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- पाकिस्तानचे वाचाळवीर परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC)च्या सभेत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे व भारत देशाबद्दल बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल,पाकिस्तान व बिलावल भुट्टो याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राजुरा चे वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालया समोर माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थिती तिव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला,यावेळी भाजपच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या तसेच नारेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,जिल्हा सचिव वाघुजी गेडाम,जिल्हा सचिव हरिदास झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, माजी नगरसेवक हरजित सिंग संधू, माजी नगरसेविका उज्वला जयपूरकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष शंकर धनवलकर, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, सुरेश रागीट, सरपंच बालनाथ वडस्कर, उपसरपंच पुष्पाजंली धनवलकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, जनार्धन निकोडे, सुरेश धोटे, अनिल खनके, कैलास कार्लेकर, छबिलाल नाईक, प्रशांत साळवे, कवडू कुंभारे, संजय समर्थ, प्रकाश आस्वले आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348