रुपेश उमराणी, मुंबई ब्यूरो चीप
मुंबई:- कालकथित महेंद्र लक्ष्मण गायकवाड (सर) यांचे 2 आगस्ट ला निधन झाले. त्यांचा चांगला स्वभाव, मधुर वाणी, सामाजिक कार्याची जानिव यामुळे ते अनेकांच्या परिचयाचे होते. त्याचे असे अचानक निघून जाण्याने त्याच्या परिवार, नातलग आणि मित्र परिवार यांना न भरून निघणारी अशी हानी झाली. त्यांची उणीव ही कायम जाणवेल आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
कालकथित महेंद्र लक्ष्मण गायकवाड (सर) यांचा जलदान विधी कार्यक्रम रविवार दि. 7 आगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता, विपश्यना बुध्द विहार, सिद्धार्थ कॉलनी चेंबूर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या जल दान विधी कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान कैलास गणेश गायकवाड, वैष्णव महेंद्र गायकवाड आणि गायकवाड परिवाराने केलं आहे.
नवनिर्मितीचे, नवसृजनाचे कोंभ फुटून सरासरा वर येतात, घटकापळाचा आश्रय घेत असीम इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद यांच्या सोबतीने स्थिरावतात आणि पानगळीचं निमित्त करून पुन्हा अनंताच्या प्रवासाला निघतात. हा काळ अतिशय चढ उतार, सुख दुःख घेऊन येत असतो. या जीवनातली प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे, अक्षय्य आहे. यावेळी काही लोक आपल्या कार्यातून, सामाजिक जाणिवेतून, वर्तनातून शरीररुपी नसतांना देखील मनात आपले न मिटणार स्थान निर्माण करतात.
Very sad to know about MAHENDRA GAIKWAD. MAY HIS SOUL REST IN PEACE, GIVE STRENGTH TO HIS FAMILY TO BEAR THE LOSS.