युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील खुमारी जलाशय पर्यटन स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारने 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील पंधरा लाख रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाला दिला परंतु वास्तवता निधी प्राप्त होऊनही कोणत्याही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याला पाटबंधारे विभागाची उदासीनता जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. त्यांनी तयार केलेले कामाचे अंदाज पत्रक थंड बसत्यात असल्याचे तसेच प्राप्त निधी परत जाण्याची शक्यता बळावल्याचेही त्यांनी सांगितले.
खुमारी जलाशयाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी ओम गणपत या ट्रस्ट अध्यक्ष महंत पुरे सत्येश्वर यावलकर राहणार मोहपा तालुका कळमेश्वर कनयाढोल पिपळा किनखेडे येथील सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी विशेष प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीने सन 2008 मध्ये या स्थळाला पर्यटन स्थळाचा “क” दर्जा प्राधान्य केला. सन २००८ ते सन 2022 या काळात या स्थळाच्या विकास कामासाठी काही करण्यात आले नाही जून 2022 मध्ये राज्य सरकारने येतील विकास कामासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करीत 15 लाख रुपयाचा पहिला हप्ता पाटबंधारे विभागाला प्राधान्य केला सध्या या जलाशयाच्या बांधावर व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झोपे वाढलेली आहे. जलाशयाकडे जाणारा रस्ता ही झुडपे व जंगली व अतिक्रमामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. बांधावर खड्डे तयार झालेले आहेत ते धोकादायक ठरू शकतात.
पाटबंधारे विभागाने निधी प्राप्त होतात या जलाच्या सौंदर्यकरणाच्या दृष्टीने प्राथमिक व मूलभूत कामे करणे अपेक्षित असताना तेही करण्यात आलेली नाहीत. निधीचा नियोजित काळात वापरण्या केल्यास परत जाण्याचे शक्यता नाकारता येत नाही असेही या जाणकाराचे मत आहे. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार करतात या परिसरातील प्रत्यक्ष पाणी असता जागेचा सखोल अभ्यास केला नाही अधिकाऱ्यांनी या भागातील जाणकार व्यक्तीशी संपर्क अथवा समनवय साधला नाही या अंदाजपत्रकात महत्त्वाच्या भागाचा विचार करण्यात आला नाही जुलै 2022 मध्ये पाटबंधारे उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले परंतु 17 जून 2019 च्या शासन शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या अत्याधिक त असलेली जमीन विश्रामे गृहे व रिक्त वसाहतीचा विकास व व्यवस्थापन खाजगी यंत्रणेकडून करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही या जलाशयाच्या काठावर व बांधावर वाढलेली झाडे झुडपी तोडणे आवश्यकच आहे तरी ते जलाशयात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तोडलेली झुडपे व लाकडे पाण्यात गेल्यास ती सांग सडून पाणी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही बांधावरी झाडे व झुडपे तोडल्यास त्यांच्या मुलामुळे बांधामध्ये खोल छिद्र तयार होणार असून ती पिपळा किनखेडे मला सांगवी धापेवडा व इतर गावासाठी धोकाठ्यात ठरू शकेल अशी माहिती सत्येश्वर यावलकर यांनी दिली आहे. संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.