युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
9923296442
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील विधानभवनावर आज दिनांक 19 डिसेंबर 2022 ला विदर्भ शाहीर कलाकार परिषद च्या वतीने लोककला सेवा मंडळ यांच्या मार्गदर्शना खाली मोर्चा प्रारंभ करण्यात आला. चाचा नेहरू मैदान शुक्रवारी तलावाच्या जवळ नागपूर येथून प्रारंभ झाला. हजारोच्या संख्येने कलावंत हजर होते. या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष मनीषभाई भिवगडे, लोककला सेवा मंडळचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारभाई घुले व विदर्भ सादर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी केले. कलावंत संच, वाद्य, साहित्य सहित हजर होते. भजनाच्या गजरात, शाहिरीच्या आवाजात, डांसरच्या ठेक्यावर , भारुडच्या शृंगारात, कलावंताच्या सुरात व भिवगडे, घुले, टेंभुर्णे यांच्या डरकाळीत, कलावंतांनी घोषणाच्या व नाऱ्याच्या माध्यमातून दुमदुमून टाकले. मोर्चाच्या माध्यमातून निवेदन सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगुटेवार यांना सादर केले.
या निवेदन मध्ये निवेदन करते पैकी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषभाई भिवगडे व लोककला सेवा मंडळचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारभाई घुले, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारभाई टेंभुर्णे, नागपूर जिल्हा सरचिटणीस अरुणभाऊ वाहने, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या महिला प्रतिनिधी निशाताई खडसे, लोकसेवा मंडळ च्या श्वेताताई रांगडहाळे यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. कलावंताच्या 15 ते 16 मागण्या चे निवेदनकर्त्यांनी सांस्कृतिक मंत्री यांना निवेदन सादर केले. त्यापैकी 90% मागण्या मंजूर करण्याच्या आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगटीवार यांनी दिले.
यानंतर मोर्चाला मार्गदर्शन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष मनीषभाई भिवगडे, लोककला सेवा मंडळ चे अध्यक्ष राजकुमारजी घुले, विदर्भ शाहीर कलाकार परिषद चे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारभाई टेंभुर्णे यांनी जोश पूर्ण मार्गदर्शन केले. या मोर्चाचे संचालन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या नागपूर जिल्ह्याचे सरचिटणीस अरुणभाऊ वाहने यांनी केले. या मोर्चात चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, गडचिरोली येथून अनेक कलावंत हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलाकार परिषदेचे नागपूर ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष शाहीर गौरीशंकर गजभिये यांनी केले.
हा मोर्चा यशस्वी ते करिता विदर्भ शाहीर कलाकार परिषद चे अध्यक्ष दयाल कांबळे वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य मनोहर धनगरे, पुरुषोत्तम कुंभे, रामेश्वर दंडारे, यादवराव कानोलकर, पुरुषोत्तम डांगोरे, नानाजी तायवाडे, पुरुषोत्तम निघोट, संजय खांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले