कवी:: गिरीश जाधव, राह. पुणे
मनाला सावरताना;
तुझा गंध दरवळतं असतो
भवतालील विश्व तुझ्या शिवाय सुन्नं असतं,
जीवन हे अंधाऱ्या राती सारखं
दाटं काळोखात बिजुनं गेलेल
तु आणि ते नाराळाचे झाड
माझे अंतर मनं,
वेदनेनी घायाळ करीत असतात
मी म्हणतो विसरावं,
ते भुतकाळातील गोड गुपित,
कशाला जगावं आठवणीतं
वर्तमानात नव्वा जोडीदार शोधतं
जगावे म्हणतो,
मृत्यृच्या प्रवासाला जात पर्यंत
तुला साखळं दंडाने
मनातुनं आता कायमची बंन्दिस्त करत
आठवणींच्या आहुतीला रॉकेल टाकत
वण्व्यात पेटवुनं दयावं म्हणतो
बघं तुला मला विसरता आलेच तर
प्रेंम हे जळणारा वणवा असतं
डणाडणा पेटत त्याचा
लालभडक विस्तवं झालेला असतो
तुला म्हणुनं सांगतो,
अखेर विस्तवाची राखं होतं असते
आपलं प्रेंम हे विस्तवा सारखेच होते,
राखं होऊनी जमीनीवर एकांतात
कायमचे शांत झोपी गेलेले
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/738544534