महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेर शहरा जवळ असलेल्या सुकेवाडी शिवारात चार घरांवरती आज्ञात 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुनील शिवाजी नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून आज्ञात सहा दरोडेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरीकांच्या घरातून एकूण पाच लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी चोरून नेला आहे, या दरोडेखोरानी घरातील छोट्या छोट्या लहान मुलींनाही धमकावून त्यांच्या कानातील सोनं काढून घेतलं. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपुरे पोलीसबळ सक्षम अधिकारी नसल्याने परिसरात चोऱ्या वाढत असल्याची तक्रारी महिला वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात संकेत नवले या कॉलेज युवकाचा मृतदेह आढळून आला होता, त्याचे मारेकरी ही अजून मोकाटच फिरत आहे, त्याचाही तपास बाकी असताना संगमनेर शहरात हा दरोडा पडल्याने या परिसरातील नागरिक अतिशय भयभीत झाले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348