✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार वर्धा जिल्हा पोलिस दलात पोलिस अधिकारी अंमलदार कडून शासकीय कामकाज संबधाने लाचेची मागणी करीत असल्याबाबत त्यांचे विरूध्द गंभीर तक्रारी असल्यास, अशा पोलिस अधिकारी अंमलदार विषयी प्राप्त गंभीर तक्रारी प्रशासकीय स्तरावर विभागीय चौकशी करण्यास व त्यावर योग्य कायदेशिर कारवाई करण्याकरीता पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी जिल्हा पोलिस दक्षता समिती ची प्रायोगिक तत्वावर स्थापना करण्यात आलेली आहे.
सदर समितीमध्ये पोलिस अधीक्षक, अपर पोलिस
अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच सहा. फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस कॉन्स्टेबल, महिला पोलिस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वर्धा जिल्हा पोलिस दलातील अधिकारी / अंमलदार यांनी लाचेची मागणी केल्यास ७८२२८३५३११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी केले आहे.

