बेनाहक दरवाढ मागे घेण्याबाबत तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना दिले निवेदन.
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:-दि.५ आगष्ट:- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचच्या सूचनेनुसार राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली आज गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारचे बेनाहक दरवाढी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारकडून होत असलेली दररोजची दरवाढ पेट्रोल, डिझेल, गॅस व जीएसटी वर झालेली मोठी दरवाढ थांबविण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेल आहे. या दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. केंद्र शासनाच्या या धोरणा विरोधात संपूर्ण देशात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज संपूर्ण देशभर केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक प्रकारच्या बेनाहक दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलने सुरू आहेत.
अन्यायकारक इंधन दरवाढ लादणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचे विरोधात गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बेनाहक दरवाढीचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल, गॅस व जीएसटी वरील दरवाढ या संपूर्ण प्रकारच्या दरवाढ तात्काळ मागे घेण्याबाबत तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिंपरीच्या वतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले.
आंदोलनात प्रामुख्याने तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस गोंडपिपरी, निलेश संगमवार कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस गोंडपिपरी, सविता बबलू कुडमेथे नगराध्यक्ष नगरपंचायत गोंडपिपरी, देविदास सातपुते सरपंच पोळसा, अशोक रेचनकर माजी उपसभापती बाजार समिती गोंडपिपरी, तूकेशजी वानोडे माजी उपसभापती पं.स. गोंडपिपरी, अनिल झाडे, अनिल कोरडे, सचिन चिंतावार नगरसेवक, सुरेश चीलनकर नगरसेवक, बालाजी चनंकापुरे, महेंद्र कुणघाटकर, आनंदराव कोडापे, सपनाताई साखलवार, विकास चापले, राजू राऊत, सुरेश श्रीवास्कर, करण चन्नावार, भैयाभाऊ चौधरी, श्रीनिवास कंदुनुरीवार, अमावस्याबाई निमसरकार, विनय मोहूर्ले, गंगारामजी सुरकर, सुरेंद्र मत्ते, साईनाथ मडावी, बालूभाऊ चिंतावार, बबलू कुडमेथे यांनी आंदोलन केले.