राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:- रोज होणारे महिलेवर अत्याचार, अपमान, सामाजिक दुजाभाव, पुरुषी मनोवृत्ती, महिलेचे स्थान असा घटना उफाळून वर यायला लागले की आपसूक सडक्या सिस्टीम आणि अंधकारमय समाजाची आठवण या शब्दांबरोबर जोडून येते. आजूनही समजामध्ये निर्लज्ज – बेशरम मंडळी खूप प्रमाणात शिल्लक असल्याचे दिसून येते. प्रसिद्ध लेखिका ज्योती किरतकुडवे (साबळे) लिखित ‘तिची नजर (रहस्यकथा)’ या कादंबरीत असे अनेक किस्से वर्णनात्मक पद्धतीने वाचकांना अंतर्मुख करायला लावतील अशा पद्धतीने लिहीले आहेत. ‘तिची नजर (रहस्यकथा)’ या कादंबरीचे प्रकाशन दिनांक २० डिसेंबर २०२२ ला संध्याकाळी शारदा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच चेरी फिल्म्सच्या निर्मात्या डॉ. प्रज्ञा खरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
प्रसिद्ध लेखिका ज्योती किरतकुडवे (साबळे) यांनी ही कादंबरी लीहली असून या कादंबरीत अत्याचारीत मुलीच्या संघर्षाची कथा असून पीडित, अत्याचारित महिला व मुलींना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि अशा पीडित मुलींना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी समाजाने त्यांना आधार द्यायला हवा, असा सामाजिक संदेश या कादंबरीतून देण्यात आला आहे. ज्योतीताई या नेहमीच आपल्या लेखणीतून महिला संघर्ष मांडत असतात. ही कादंबरी वाचून समाजातील अनेक युवा पिढी त्यातून एक मोलाचा संदेश घेतील असं ज्योतीताई यावेळी म्हणाल्या.

याप्रसंगी शारदा प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन खरात, सदस्य स्वप्नील खरात, लेखक मंदार गायधनी व त्यांच्या पत्नी, विनोदी अभिनेता जयवंत भालेकर, दिनेश साळवे, कुमार आर्यन, कुमार ओसीन तसेच कुमारिका प्रिशा व सोनाली उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

