सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- आजकाल कुठलेही शासकीय काम म्हणजे “सरकारी काम चार दिवस थांब” असच दिसून येत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कधी कधी चिरीमिरी मिळण्याच्या आशेने पण सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वेळखाऊ धोरण राबवित असतात.
राजू किसनराव वानखेडे राहणार श्रीराम वार्ड बल्लारपूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांना आरएनआय नवी दिल्ली तर्फे साप्ताहिक “बल्लारपूर मंथन” या मथळयाखाली साप्ताहिक न्यूज पेपर प्रकाशित करण्यासाठी टायटल व्हेरिफाइड दिनांक: 10 नोव्हेंबर 2022 ला झाले होते. त्या अनुषंगाने त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करून दिनांक: 29 नोव्हेंबर 2022 ला बल्लारपूर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे दाखल केले होते. तसेच दिनांक: 01 डिसेंबर 2022, दिनांक: 06 डिसेंबर, दिनांक: 07 डिसेंबर, दिनांक: 08 डिसेंबर 2022 आणि दिनांक: 12 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देऊन पुन्हा मागितलेल्या कागदा पत्राची पूर्तता केली. याची सर्व नोंद त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आहे. परंतु काम न झाल्याने शेवटी त्रासून जाऊन दप्तर दिरंगाई कायदा 2006 चा वापर करण्यात आला.
यात दिनांक: 19 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या बाबत जिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना तसेच कनिष्ठ लिपिक, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या बाबत उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांना दप्तर दिरंगाईचा कायदा 2006 पंजीबद्द डाकेने देण्यात आला. यात दप्तर दिरंगाई बाबत शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी राजू वानखेडे यांनी केलेली आहे.
राजू किसनराव वानखेडे यांनी सांगितले आहे की, ते पेपराचे मालक असून त्यांचा पेपर निघो नाही तर नको निघो परंतु अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे मी आज बल्लारपूर उपविभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई बाबत शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे. एका वृत्तपत्राच्या संपादक पत्रकारांना इतका त्रास सहन करावा लागत असेल तर सामान्य जनतेच काय हाल होत असणार हे यावरून सिद्ध होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

