Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले, मग घरात शिरून त्याच्या पत्नीचा केला विनयभंग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले, मग घरात शिरून त्याच्या पत्नीचा केला विनयभंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक :- सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे.

दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या घरात शिरून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याने याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सावकारास अटक केली आहे. चेतन प्रकाश बाेरकर ३२, रा. तांबोळी गल्ली, हिरावाडी असे या खासगी सावकाराचे नाव आहे.

तीन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कर्जवसुलीच्या धमक्यांनी भयभीत झालेल्या गौरव व नेहा जगताप या तरुण दाम्पत्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असतानाच पंचवटीत खासगी सावकाराने घरात शिरून विनयभंग केल्याचा प्रकार समाेर आला आहे . त्यामुळे या घटनांनी खासगी सावकारीचे वास्तव उघडकीस आले आहे. संशयित सावकार चेतन याने दहा टक्के व्याजाने ज्याला पैसे दिले, त्याच्या पत्नीने पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पतीने फेब्रुवारी २०२० मध्ये संशयित चेतनकडून चार लाख ५० हजार रुपये दहा टक्के दराने घेतले होते. ते पैसे न दिल्याने चेतनने आपल्या पतीस त्याच्या कारमध्ये बळजबरीने बसवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने ऑनलाइन पद्धतीने चेतनला ५० हजार रुपये दिले व त्यानंतर अडीच लाख रुपये दिले. दोन महिन्यांपूर्वी आपला पती घरी नसताना चेतन घरी आला व विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस ठाण्यात सावकाराविरोधात विनयभंग, अपहरण, महाराष्ट्र सावकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन चेतनला मंगळवारी दि.२०रात्री अटक करण्यात आली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने चेतनकडून दहा टक्के व्याजाने फेब्रुवारी २०२० मध्ये चार लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, वसुली करताना चेतनने व्याजासह २६ लाख ९८ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी तीन लाख रुपये पतीने चेतनला दिले होते. त्यामुळे संशयित सावकाराने मुद्दलीच्या सहापटीने वसुलीचा तगादा लावला होता.

Previous Post

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार दंडाची शिक्षा.

Next Post

आमदार सुभाष धोटेंनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्यथा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आमदार सुभाष धोटेंनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्यथा.

आमदार सुभाष धोटेंनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्यथा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In