संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामाणुजम यांची जयंती व गणित दिवसाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणित विषयावर आधारित गीत, संगीत, नृत्य, वेशभूषा, भुमिका अभिनय, प्रतिकृतींचे प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम सादर केले.
भारतात दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रिय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित आहे. 2012 मध्ये, केंद्र सरकारने अशी घोषणा केली होती की, दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. हा दिवस साजरा करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिताच्या स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रवृत्त केले जाते. त्याचमुळे इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जोया चाऊस, अनुराज पांडे या विद्यार्थ्यांनी केले.