पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पूणे :- दिनांक १३ / १२ / २०२२ रोजी रात्रौ २२.३० वा ते २३.०० वा मे दरम्यान दुगड शाळेजवळ, सच्चाईमाता परीसर, खुर्द, पुणे येथे प्रकाश निवृत्ती रेणुसे, वय २७ वर्षे रा. अटल १२ कावळे चाळ, दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने व दगडांनी मारहाण केली असल्यामुळे त्यास ससून हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी अंडमीट केले असता तो दिनांक १९/१२/२०२२ रोजी ससून हॉस्पीटल येथे मयत झाला आहे म्हणुन अनिल प्रल्हाद मोराले, पोलीस हवालदार २२३०, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे यांनी सरकारतर्फे नकार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४३ / २०२२ भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील मयत इसम प्रकाश निवृत्ती रेणुसे यास नक्की कोणी मारहाण करून त्याचा खुन केला आहे याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे माहीती घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना मयत इसमास इसम नामे आदित्य कांचन, संकेत पवार, अभिजीत सावंत त्यांचे साथीदारांनी मिळून मारहाण करुन त्याचा खुन केला असल्याची गुप्त बातमीदारामार्फेतीने खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, राहुल तांबे, अभिजीत जाधव यांनी आरोपी १. आदित्य महेश कांचन वय २० वर्षे धंदा हमाली काम रा. सध्या अटल ११. दुगड शाळेमागे कावळे चाट कात्रज, पुणे मुळ गाव उरळीकांचन ता. हवेली, जि. पुणे २. संकेत सुरेश पवार, वय १९ वर्षे, धंदा बेरोजगार, रा. सध्य अटल ११. दुगड शाळेशेजारी, राजमाने चाळ, कात्रज, पुणे मुळ गाव साळुंगण, ता. भोर, जि. पुणे ३. अभिजीत किसन सावंत, वय २४ वर्षे, रा. जैन मंदीरजवळ, सच्चाईमाता मंदीराचे मागे, कात्रज, पुणे यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक २०/ १२ / २०२२ रोजी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे). विजय पुराणिक हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, अभिजीत जाव राहुल तांबे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, निलेश: खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, नितेश चौरगीले, यांच्या पथकाने केली आहे.