अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अरूण उपर्वट कार्यरत असताना त्यांना एक दुचाकी चालक संशयितरित्या वाहन चालवताना दिसला त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. परतु तो थांबला नाही त्यानंतर त्यांचा पोलीस कर्मचारी यांनी पाठलाग केला असता तो वाहन सोडून पळून गेला सदर वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अरुण उपर्वट यांची शहरात पेट्रोलिंग करीत कार्यरत असताना एक वाहन चालक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी वाहन न थांबवता तो भरदाव वेगाने निघून गेल्याने त्याचा पाठलाग पोलीस कर्मचारी अरूण उपर्वट यांनी केला त्यानंतर सदर दुचाकी वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेत जमा करण्यात आले व त्या दुचाकी ची चौकशी केली असता सदर वाहन चोरिचे असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहन पैठण जी औरंगाबाद येथील व्यक्तीचे असल्याने त्यांना वाहन सुपुर्द करण्यात आले.
अकोला पोलिस वाहतूक निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अत्यंत उत्कृष्ट असे काम करत असून पोलिस वाहतूक निरीक्षक मा विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे ऍड रोशन तायडे विशाल भोसले यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन अरुन उपर्वट यांचा सत्कार केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348