अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विश्ववंदनिय छ. शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरूषांच्या बदनामी च्या विरोधात सावनेर तालुका पुरोगामी संघटनेच्या तसेच विविध राजकिय पक्ष संघटनेच्या वतीने आज दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. कोश्यारी मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद चे नारे देत तहसिल कार्यालयावर भव्य धडक निषेध मोर्चा नेण्यात आला.
वारंवार महापुरूषांची बदनामी करणाऱ्या आरएसएसचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी तसेच राष्ट्रनिर्माते बहुजन समाजाचे आराध्य दैवत व बहुजनांचे प्रेरणास्थान असलेले युगपुरूष विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची आराध्य दैवत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मविर भाऊराव पाटील, माँ साहेब जिजाऊ व अन्य महापुरूषांच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारात सत्तेत असलेले संघ प्रणित भाजपाचे लोक मागील 10 वर्षापासून महापुरूषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करीत जातीय तेढ निर्माण करून महापुरूषांची बदनामी करीत असून त्यात संवैधानिक पदावर असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे काळी टोपी घालून संविधानाचा व महापुरूषांचा वारंवार अपमान करीत आहे. तसेच मंत्रीपदावर आरूढ असलेला चंद्रकांत पाटील, मंगल प्रसाद लोढा, सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, राम कदम हे सर्व आरएसएस प्रणित भाजपचे लोकांना त्यांची जागा दाखविण्या करीता केन्द्र सरकार, राज्य सरकार मधुन व संवैधानिक पदावरून पाय उतार करण्याच्या मागणीचे निवेदन घेवून नारे देत तहसिल कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा धडकविण्यात आला.

हा मोर्चा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्या पासून वार्ड नं. 4 महात्मा फुले वार्ड सोसायटी सावनेर येथून सकाळी 11 वा. निघून बस स्थानक येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गांधी चैक येथील महात्मा गांधी यांचा पुतळा ते बाजार चैक, होळी चैक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरूषांच्या पुतळयाला माल्यार्पण करून तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तहसिलदार यांनी बाहेर येवून आंदोलनकाऱ्याचे निवेदन स्विकारले.
या मोर्चाला संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आम आदमी पार्टी, जनकल्याण सामाजिक संघटना, जय शिवाजी सामाजिक संस्था, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, कॅरियर वे अकादमी, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), बहुजन मुक्ती आंदोलन, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन क्रांती मोर्चा, गोंडवाना आदीवास रिसर्च फाऊंडेशन सावनेर, राहत फाउंडेशन, विशाखा महिला मंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संविधान ग्रुप गुजरखेडी, संत शिरोमणी रविदास महाराज सामाजिक संस्था, बहुजन नायक कांशीराम विचार मंच सावनेर, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन समाज पार्टी, भारतीय परिवर्तनवादी संघ, बहुउद्देशीय परिवर्तन महिला मंडळ सावनेर, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती, लोक स्वराज्य पार्टी, इंटक संघटन कोयला क्षेत्र सावनेर, एस.सी.एस.टी.ओबीसी काऊंसिल कोयला क्षेत्र सावनेर, रूद्रा महिला पत संस्था सावनेर ईत्यादीसह अनेकांचे समर्थन प्राप्त होते.

या मोर्चात दिनेश इंगोले, सेवकराम राऊत,भगवान चांदेकर, संजय टेंभेकर, संजय राऊत, संदीप भोंगाडे (गुरुजी), प्रशांत ठाकरे (साई मंदीर), प्रशांत ठाकरे (बालाजी लाॅन), विनोद मानकर, सुरेशबाबू डोंगरे, गणपती पठाने, दिगांबर गजभिये, सुभाष मछले, राजु खांडे, विक्रम गमे, गजू कोमुजवार, शांताराम ढोके, पवन लांबट, रोहीत वालके, बलराम चोरे, विनोद तांदुळकर, सिद्धार्थ मांडवे, मोरेश्वर गोडबोले, शकिल झेडीया, कम्मू भाई, चिंधबा डफरे, राकेश भाटी, प्रा.माधुरी भाटी, यशवंत पाटील, साहेबराव महल्ले, रत्नमाला रागासे, विशाखा महिला संघ, योगेश खुरपडे, सुभाष साळवे, राजू सोनटक्के, ज्योति सोनटक्के, निर्मलाबाई कांबळे, राहुल कांबळे, अशाेक नानवतकर, देवेन्द्र छत्रे, संजय डहाट, मयुर नागदवने, बबन गजघाटे, मनोज बागडे, केदारनाथ भाटी, बंडू गायकवाड, दिलीप वाठोडे, दादाराव लांजेवार, लेखराज शेंडे, मदन मोरे, दशरथ साळवे, मन्नु कडू, उमेश गणोरकर, ईत्यादींसह अनेक महिलांची उपस्थिती होती.