सोनु कोरी पुणे शहर प्रतिनिधी
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे:- दि. २१.१२.२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनिय माहिती मिळाली की एस. के रेसिडेन्सी लॉज, लक्ष्मी कॉलनी, सोलापुर रोड, हडपसर, पुणे येथे मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली असता वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०३ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. असुन, त्यांना संरक्षणकामी रेस्क्यु फाउंडेशन, हडपसर पुणे येथे ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकरणी ०१ आरोपीला अटक करण्यात आले असुन व ०१ पाहिजे आरोपी असे दोन आरोपी विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १६२३ / २०२२ भादविक ३७० ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, श्री श्रीनिवास घाडगे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, (अति. कार्यभार) श्री. अमोल झेंडे गा.पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व गार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस जंमलदार राजेंद्र कुमावत बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

