विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव, दि.23:- रोजी रोजी सकाळी न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव यांच्या वतीने एसएससी 2022-2023
पालक मेळावा व पालक शिक्षक संघ सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री वसंत विश्वनाथ शिंदे व या सभेचे मार्गदर्शक श्री विजय बाबुराव गोर्डे पा. चेअरमन सदस्य स्थां. स्कूल कमिटी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नळे अनिल तुकाराम हे होते. उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ मार्गदर्शक श्री नंदकुमार गणपत जेजुरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती त्यावेळी शाळेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यापुढे आपण आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शैक्षणिक हितासाठी आम्ही काय काय केले पाहिजे याविषयी पालकांना अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्याने मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत आपल्या पालकांचे न ऐकता अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत काही युवक युवती चुकीच्या मार्गाकडे देखील जात आहे त्यामुळे पालकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं व अभ्यास करतो का नाही किंवा तो काय करतो या सर्व गोष्टी कडे लक्ष देऊन आपला मुलगा कसा यशस्वी होईल याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे योग्य मार्गदर्शन न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व अधिकारी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348