मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
9011851745
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- पडोली ते भद्रावती मार्गा वरील टी पॉइंट जवळ असलेले तडाली येथील सुंदरभाऊ भोजनालयला रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगेने उग्ररूप धारण करून सर्वत्र आगीमुळे धूळ निघत होता. हे बघून पेट्रोलिंग साठी निघालेल्या पोलीस व्यान रोड ने जात असल्याने पोलिसांनी ताबडतोब अग्निशामक विभागाला या आगीची माहिती फोन वरून दिली. या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशामक कर्मचारी आगबांब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेनंतर या आगिवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी टळली.
या संबंधात हॉटेल मालकास माहिती दिली असता, त्याच्या माहिती नुसार, अज्ञात व्यक्तींनी इर्षा, आकस च्या हेतूने हॉटेल ला आग लावली असेल असे तक्रार केली. हॉटेलचे मालक सुंदर पांडुरंग सोनेकर, वय वर्ष 53, राहणार – ताडाली यांचे असे म्हणणे आहे. या भीषण आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची अंदाजित रक्कम 1 लाख 10 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. असे प्रतिपादन सुंदर सोणेकर यांचे आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस अधिकारी करीत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

