युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अगोदरच हे हिवाळी अधिवेशन विविध कारणाने गाजत आहे. त्यात अजुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने आत्मदहनाचा प्रय़त्न केल्याचा घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांबद्दल अवमानजनक बोललं जात आहे. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो. त्याच संतापामधून नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान कविता चव्हान वय 28 वर्ष, रा. सोलापूर या तरुणीने विधान सभेसमोर मुख्य गेटवर गोंधळ करत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रय़त्न केला आहे. पण तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, नागपुरात विधानभवनाच्या मुख्य दारासमोर एका 28 वर्षी तरुणीने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव कविता चव्हाण असून ती सोलापूरची आहे.. महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा करत तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कविता चव्हान हिला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या तिला पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348