Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बल्लारपूर पेपर मिलच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रिया झांबरे यांचे आमरण उपोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बल्लारपूर पेपर मिलच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रिया झांबरे यांचे आमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यामधील बल्लारपूर शहर हे बल्लारपूर येथे असलेल्या पेपर मिल मुळे नावलौकिकास आले शहराला मोठ्या प्रमाणावर शोभा आली रोजगार उत्पन्न झाले परंतु काही मिळवण्यासाठी निश्चितच काही गमवावे लागते अशाच पद्धतीने पेपर मिल मुळे प्रदूषणामध्ये वाढ होणे हवेमध्ये दूषित गॅस पेपर मिलच्या माध्यमातून पसरविला जाणे याचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले प्रदूषण विभाग देखील अनेक वेळा तक्रारी होऊ नये याकडे दुर्लक्षच करीत असतानाचे आपण बघितले आहे.

पेपर मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून एका प्रस्थापित युनियनची गुलाम झाली असल्याचा आरोप करीत अनेक संघटनांनी आंदोलन केले परंतु त्यांची आंदोलन दडपण्यात आली तेव्हा ना आंदोलक नेते हे सेटल झाले असा देखील आरोप बरेच वेळा कामगारांनी लावला. त्यामुळे आता कामगारांना नेत्यांवरचा विश्वासच राहिलेला नाही परंतु कामगारांची समस्या कामगारांचे होत असलेले शोषण हे आजही बल्लारपूर पेपर मील मध्ये कायम आहे. जिल्ह्यातील एका बलाढ्य मानल्या जाणाऱ्या नेत्याची किमान दोन दशकां पासून त्या ठिकाणी युनियन आहे. कुठल्याही बेरोजगाराला स्थायी अथवा अस्थायी करण्याची ताकद ही कंपनी प्रशासनामध्ये नसून युनियन मध्ये आहे. जे निश्चितच बेकायदेशीरपणे सुरू आहे. कामगार कायद्याला तिलांजली देत सर्रासपणे मनमानी कारभार या बलाढ्य नेत्याची युनियन करते आहे. व यांना थांबविण्याकरिता झालेल्या सर्व प्रयत्नांना साम, दाम, दंड भेद वापरून या बलाढ्य नेत्याने आज पर्यंत विजय मिळवला आहे. परंतु कामगारांच्या मनात मात्र हा नेता आजही घर बनवू शकलेला नाही. आजही या मोठ्या नेत्याला कामगाराच्या मनामध्ये स्थान नाही. फक्त भीती पोटी म्हणून कामगार हा आपला आवाज मनामध्येच ठेवून युनियनला शरण गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती बदलविण्याकरता व कामगारांचा संपलेला आत्मविश्वास कामगार कायद्यावर व कायद्यावर उडालेला विश्वास परत प्रस्थापित करण्याकरता व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपूर महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती प्रिया झांबरे या स्वतः कामगारांचे शोषण थांबवावे, कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे तसेच नियमानुसार अस्थायी कामगारांना स्थायी करण्यात यावे व अस्थायी कामगाराला स्थायी करण्याकरता युनियनच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार थांबावा तसेच बल्लारपूर पेपर मिल मुळे पेपर मील मागील रहिवासी परिसरात पहाटे पहाटे तीन ते चार वाजता सोडण्यात येणाऱ्या गढूळ पाण्याने तेथील परिसरातील नागरिकांना होणारा त्रास हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा याकरिता नगर परिषद बल्लारपूर जवळ पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पेपर मिल तथा बल्लारपूर नगरीतील नागरिकांनी या उपोषणाला सार्थक करण्याकरता व बल्लारपूर पेपर मिल मधील कामगारांच्या समस्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता साथ द्यावी अशी विनंती युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आली आहे.

वृत्त लिहिस्तोवर तरी पेपर मिल् कंपनी प्रशासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नसल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे. परंतु लवकरच सदर मुद्दा हा युवा स्वाभिमान पक्षाचे सर्वसर्वा आमदार श्री. रवी राणा यांच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून यावर बैठकीच्या माध्यमातून तात्काळ मागण्या मान्य करून घेण्याकरिता प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या उपोषणाकडे आपला आत्मविश्वास गमावून बसलेला कामगार कशा पद्धतीने पाहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना, 28 वर्षीय तरुणीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न.

Next Post

विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.

विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In