मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- अहेरी विधानसभा क्षेत्रातील शोषित,वंचित व पिढीत समाजाला पूर्वी पासूनच आपल्या पायाखाली दाबून ठेवण्याची प्रथा अहेरीचे दोन्हीं घराण्यामध्ये असून ती प्रथा आजही कायम आहे.विधानसभा क्षेत्रातील गरीब लोकांची सेवा करण्याची वृत्ती अहेरीतल्या दोन्हीं घराण्यांमध्ये नसून विकासाच्या बाबतीत अहेरीचे दोन्ही घराण्यांनी मिळून संपूर्ण विधानसभा क्षेत्राची वाट लावल्याचे गंभीर आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.
मूलचेरा तालुक्यातील मोहूर्ली येथे यंगस्टार कब्बडी क्लब कडून ग्रामीण भागासाठी आयोजित खुले कबड्डी सामन्याचे उदघाटनिय समारंभाला अध्यक्षस्थानावरून बोलतांना वरील गंभीर आरोप केले. या कबड्डी सामन्याचे उदघाटन आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला तर समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक बंडावार, देव्हारे,ग्राम पंचायत सदस्या दिशाताई नैताम,माजी सरपंच रवींद्र वनकर, विनायक राजलवार, लहुजी मनबत्तूलावार, संतोष कासनवार,संजय बिश्वास,मुन्नाजी नैताम, कल्पनाताई दब्बा,मारोती आलाम,काशिनाथ मेश्राम,मेश्राम, टेकाम मॅडम,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार दिपक दादा आत्राम पुढे बोलतांना म्हणाले,धर्मरावबाबा आत्राम हे मागील वीस वर्षांपासून आमदार आहे.त्यांनी तीनदा विविध खात्याचे राज्यमंत्रिपद भोगले.त्यांचे पुतणे अंबरीश्रराव आत्राम हे पाच वर्षे राज्य मंत्रिपदावर होते.काका व पुतन्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषविले तरीही आज अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आवसून उभ्या आहेत. अहेरीचे दोन्ही घराणे गडचिरोली जिल्हा तर सोडा त्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्राची समतोल विकास घडवून आणण्यात ही पूर्णतः अपयशी ठरले असून या क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मागील तीन वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्या नावाचे विकासाचे एकही दगड कुठेही दिसून येत नाही, म्हणून विधानसभा क्षेत्रात विकासपर्वासाठी आदिवासी विद्यार्थी संघच एकमेव पर्याय असून भविष्यात होऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आविसंच्या मावळ्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आविसं नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या उदघाटनीय भाषणातून कबड्डी या खेळाविषयी उपस्थित खेळाडूंना मोलाचे मार्गदरशन केले. मोहूर्ली येथे ग्रामीण भागासाठी आयोजित कबड्डी सामन्याचे उदघाटनीय समारंभ यशस्वीतेसाठी यंगस्टार कबड्डी क्लबचे खेळाडूंनी परिश्रम घेतले.या उदघाटनीय समारंभाला मोहूर्लीसह परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.