अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नंबर -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त सावनेर येथे 21 ऑक्टोंबर ला श्री.संत संताजी जगनाडे महाराज देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री.संत संताजी जगनाडे महाराजांचा अभिषेक, पूजा अर्चना, आरती करण्यात आली यावेळी तेली समाज कमिटीचे अध्यक्ष श्री गोपाल घटे यांच्या हस्ते पूजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री. गोपाल घटे यांनी उपस्थितांना सांगितले की संतांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात आनंद निर्माण करावे असे मार्गदर्शन केले.
11.30 वा.ह.भ.प.श्री.संतोष महाराज निंबाळकर आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाचे सर्व भक्तात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या महा प्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये डॉ.विजय घटे, विजय बालपांडे, जयंत पाटील, भालचंद्र पाटील, मदन पाटील, विनायक हटवार, रमेश घटे, योगेश पाटील, शेखर कावडकर, नारायण तपासे, राजू कळंबे, शांताराम अंतुरकर, डॉ.मानकर, स्वप्निल देशमुख, दिलीप घटे, वनिता सुरकार, वैशाली घटे, रेखा कळंबे, सोमेश्वर भुसारी, सोमेश्वर भुसारी, प्रदीप घटे, पांडुरंग देशमुख, चंद्रकांत रहाटे, मेघा घटे, वैष्णवी तपासे,राजू देशमुख, विनोद घटे, प्रकाश बालपांडे, भगवान रायकवाड, संदीप घटे, श्री. चकाेले व सौ.भुते तसेच गावकरी मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

