महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ओझर खुर्द:- ख्रिस्ती धर्माचा सर्वात पवित्र सण म्हणजेच नाताळ ख्रिसमस या सणाचे औचित्य साधून दिनाक 24 रोजी ओझरखुर्द मधील ख्रिस्ती धर्मगुरू रेव्ह. सुरेश कदम यांचा चर्चच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर खुर्द येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी सर्व मुलांना नाताळ या सणा विषयी माहिती दिली. परस्परांना ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्वांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला.
या कार्यक्रमा प्रसंगी मुख्याध्यापक विनायक भोसले, अशोक बोर्डे, स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पास्टर दत्तू भोसलेसह इतर शिक्षक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

