साहित्य संमेलनाचे उदघाटन म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर.
प्रशांत जगताप, संपादक
7385445348-9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
बदलापूर:- 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी बदलापूर, जि. ठाणे येथे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाच्या अध्यक्ष पदी डॉ. गौतमिपुत्र कांबळे यांची निवड आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते करण्यात आली. असे मुख्य आयोजक आणि महासचिव बी. अनिल तथा अनिल भालेराव आणि अध्यक्ष ऍड श्रीकृष्ण टोबरे यांनी दिलेल्या परीपत्रकातून दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीने ऐतिहासिक ठरलेल्या बदलापूर नगरीत विकास प्रबोधिनी, मुंबई आयोजित 8 वे आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहे. या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी आंदोलन आणि चळवळीला एक नवी दिशा देण्यासाठी हे साहित्य संमेलन महत्वाचे ठरणार आहे.
8 वे आंबेडकरी साहित्य संमेलनात अनेक विख्यात कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी अनेक साहित्यिकाच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात येनार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेने या आंबेडकरी साहित्य संमेलनाला तन- मन- धनाने मदत करून या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे यशस्वी करण्यासाठी मदत करावी असे आव्हान आयोजकांनी केली.
ऍड. श्रीकृष्ण टोबरे, अनिल भालेराव (बी. अनिल), कार्यकारणी सभासद आणि विशेष सहकार्य दिलीप शेठ पवार (शहर अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी), संजय कांबळे (वंचित बहुजन आघाडी) डॉ. विकास कांबळे, राजू भालेराव, शामराव सोमकुंवर, अरविंद कांबळे, सुनील क्षीरसागर समाजसेवक डॉ नंदकुमार कांबळे, युवा नेतृत्व आनंद सोनकांबळे सर, साहित्यिक डॉ. अनिल साबळे, डॉ. दिलीपकुमार कांबळे, लाला साहेब जाधव, सूर्यकांत जाधव, महिंद्र कांबळे, राजेंद्र गायकवाड, नाट्य अभिनेते बुद्धम धाइजे, आर. बी.घनघाव, गौतम वाघमारे, महिंद्र नवगिरे, सिद्धार्थ कदम, विश्वास जाधव, सूरज साळवे, नवनीत तायडे, डॉ. सतीश शिरसाठ, डॉ. त्र्यंबक दूनबळे, मनोज दाभोळकर, डॉ. रवींद्र जाधव, नाना मोरे, शाम बैसाणे, भटू जगदेव यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श झालेल्या बदलापूर नगरीत नियोजित ८ व्या आंबेडकरी साहित्य संमेलनास प्रसिध्दी दिल्याने संमेलनाचा भरपूर प्रचार आणि प्रसार होत आहे याबद्दल विकास प्रबोधिनी या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने व माझे सर्व सहकारी आणि बदलापूरचा अभिमान, ७.व्या आंबेडकरी साहित्य संमेलनात युवा साहित्यिक पुरस्काराने सन्मानित झालेले, जेष्ठ साहित्यिकांना लाजवेल असे साहित्य भांडार ट्रस्ट, कवी बी. अनिल तथा अनिल भालेरावांच्या वतीने प्रशांत भालेराव साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो तथा धन्यवाद देतो.