शिवसेना तालुका प्रमुखांनी वेधले लक्ष:अधिवेशनात विषय मांडणार अंबादास दानवेंची ग्वाही.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- हा उद्योग विरहित तालुका आहे.या तालुक्यात बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात फौज आहे असे असतांना तालुक्यात करंजी येथे ३५ एकरचा सुरक्षित भूखंड महाराष्ट्र लघुउद्योगिक विकास महामंडळ करिता सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे.हा भुखंड १९८० दशकापासून लघूउद्योगा करिता संरक्षित ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी अद्याप उद्योग आलेले नाही. एवढेच नाही तर या परिसरातील लोकप्रतिनीधी याकामी निरुत्साही आहेत त्यामुडे या ठिकाणी उद्योग उभारण्यात येऊन बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे बेरोजगार सुशिक्षित युवकांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते यांनी निवेदनातून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र यांच्याकडे विश्राम गृह चंद्रपूर येथे भेट घेऊन दि.(२५) रविवारी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.निवेदन स्वीकारून प्रश्न गंभीर असून नक्कीच शासनाचे लक्ष वेधू असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला