✒️नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:- बोरिलवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्न ठरवून दोन महिने झाले तरीही घरातले विवाह लावून न देत नव्हेत या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या घरातच गळफास घेत स्वतःचं जीवन संपवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही बोरिवलीच्या एल टी रोड, भंडारी चाळ परिसरात राहते. तिचं दोन महिन्यांपूर्वीत लग्न ठरलं होतं. लग्न ठरलं त्यावेळी मुलीचं वय हे १७ वर्षे इतकं होतं. ही मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार हे लग्न मुला-मुलींच्या कुटुबियांसाठी अडचणीचं होतं. त्यामुळेच घरातल्यांनी मुलीला २ महिन्यांनी १८ वर्ष पूर्ण होत असून त्यानंतर लग्न करण्याचे ठरवले.
मात्र, याच रागातून मुलीने शुक्रवारी, २३ डिसेंबरला घरात कोणी नसताना किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून मुलीच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यासाठी मृतदेह शताब्दी या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348