सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभाग च्या वतीने… दिनांक 25 डिसेंबर 2022 रविवारला, दीक्षाभूमी चंद्रपूर येथे दु.3.00 वाजताच्या सुमारास विविध विषयाला घेऊन जिल्हास्तरीय तात्काळ महत्वाची मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते.
सभेचे अध्यक्ष इंजी. नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोकजी घोटेकर, प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता जगदिपजी खोब्रागडे, भिमलाल साव, श्री. जिवने, तालुका अध्यक्ष, कोरपना, ऍड परेकर, शाखा, धर्मुजी नगराळे तालुका अध्यक्ष राजुरा, राकेश रंगारी तालुका अध्यक्ष भद्रावती, कविताताई खैरे शहर अध्यक्षा वरोरा हे प्रामुख्याने उपस्थिती होते.
या सभेचे प्रास्ताविक संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले. तर सभेमध्ये नियोजित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
१) संस्थेचे धम्मयान कॅलेंडर 2023 चे विमोचन करण्यात आले
२) संस्थेचे “धम्मयान मासिक” प्रत्येक तालुकतात वर्गणीदार तयार करणे.
३) श्रामनेर शिबिर घेणे.
४)भव्य बौद्ध धम्म परिषद घेणे, उपासिका शिबिर, समता सैनिक दल शिबिर घेणे.
५) बुद्धगया पर्यटन काढणे.
या सर्व विषयावर सविस्तरपणे चर्चा करून सर्वांनुमते सर्व विषय/ठराव मंजूर करण्यात आले.
त्यानंतर “संविधान जागर” या विषयावर अशोकजी घोटेकर यांनी सविस्तरपणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारे संविधानाचा जागर हा कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेताजी भरणे यांनी सभेला सविस्तर मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानून असेच नेहमी सहकार्य करावे असे संबोधन केले. कार्यक्रमाचे संचालन किशोर तेलतुंबडे, सरचिटणीस शहर शाखा, यांनी केले. सदर सभेमध्ये कोरपणा तालुक्यातील, राजुरा तालुक्यातील, भद्रावती तालुक्यातील, विसापूर वरून वानखेडे, पुणेकर, सातकर, बोधाचार्य भाऊरावजी दुर्योधन, कृष्णदासजी गजभिये आणि समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

