पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 2
पुणे :- दि. 21/04/2008 रोजी बालाजी नगर झोपडपटी, मोसरी या ठिकाणी आरोपी नामे आप्पा गोगाजी मोहिते 50 वर्ष याने अनैतिक संबधास बाधा ठरणा-या त्यांचे मैत्रीणीस के एस. बी. चौक, पिंपरी येथून जबरदस्तीने अपहरण करुन तिला त्याचे घरात कोंढुन ठेवुन तिची निर्घुणपणे हत्या केल्यावरण भोसरी पोलीस स्टेशनला गु.र.क्र. 163/2008 कलम 302,366,342 भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गायब होता. नियमितपणे त्याचा पत्ता बदलत होता. तो त्याचे मुळ गावी तसेच सासुरवाडीस मिळुन येत नव्हता. आरोपी हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील प्रकाश चव्हाण या गंगचा सक्रिय सदस्य
असल्याने तसेच त्याच्याविरोधात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत सारखे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी तपासाची दिशा बदलुन त्याचे 15 वर्षांपूर्वीचे सहआरोपी व प्रकाश चव्हाण गॅगचे सदा मार्फतीने तपास करण्याचे ठरविले. त्यानुसार तपास करत असताना माहिती मिळाली की आरोपी आप्पा गोगाजी मोहिते हा सध्या मु.पो. वाकी, ता. राजगुरुनगर, जिल्हा पुणे या खेडेगावात लपून राहत असून चाकण एमआयडीसी मध्ये मिळेल त्याप्रमाणे मजुरी काम करत आहे. तसेच तो अल्पावधीतच औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजले. पोलीसांनी वाकी गावात जावुन गोपणीय माहिती काढली असता तो तेथे नाव बदलुन राहात असल्याचे समजले तरोध दिवसभर तो चाकण एमआयडीसी मध्ये मिळेल ते काम करत असल्याने दिवसा घरी नसल्याची माहिती मिळाली. आरोपीचा 15 वर्षापूर्वीचा फोटो असल्याने व सध्य स्थितीमथिल फोटो उपलब्ध नसल्याने त्यास चाकण एमआयडीसी परिसरात शोधणे अवघड होते. त्यामुळे पोलीसांनी वाकी परीसरात सापळा लावुन व्यास रात्री घरी जात असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मयत महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध असल्याचे सांगुन ती त्याचे पत्नीस घटस्फोट घेवुन तिच्याशी लग्न कर नाहितर बलत्काराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी देत असल्याने तिचा खुन केला असल्याचे त्याने कबुल केले. आरोपीस पुढील कारवाई कामी भोसरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस नाईक 1417 महाडीक, पो.ना. 1524 सचिन गोरे, पो.शि. 1791 गजे, पो.शि. 2959 महाले यांचे पथकाने केली आहे. तपासकामात पो.ह. 754 कमले व तात्रीक शाखेचे प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केलेले आहे.