पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महळूंगे पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
पुणे :- मौजे निघोजे, ता-खेड, जि-गुणे येथील श्री. धनंजय नवनाथ बनसोडे, पय ४३ वर्ष यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असुन त्यांची ग्लोबल फुड्रा नावाची कंपनी आहे. ते दिनांक १५/१२/२०२२ रोजी २२:०० ते दिनांक १६/१२/२०२२ रोजीचे ०९:०० वा चे दरम्यान राहते घरातुन कोठेतरी निघून गेल्याचे तक्रारी
वरुन प्रथम मानव निर्सिग रजिस्टर नंबर ३६६ / २०२२ दाखल करण्यात आली होती. सदर मानव मिसिंग प्रकरणाचा अधिक तपास करत असताना निर्सिग व्यक्ती धनंजय बनसोडे त नागपुर येथील महिला यांचेमध्ये गेले ३ वर्षापूर्वी फेसबुक सोशल मिडीयाद्वारे ओळख होवुन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण जराल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रेमबंधाची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी
मुले सुजित वय २१ वर्ष व अभिजित वय ५८ वर्ष यांवमध्ये वारंवार बाद होऊ लागले. सदरचे प्रेमसंबंध है मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे आपली मुले हे आपला घातपात करून जिवे ठार मारतील अशी शंका मयत धनंजय यास आली होती. तशी शंका मयत धनंजय याने त्याची नागपुर येथील प्रेमिकेस बोलुन दाखवली
होती. सदर मानव मिसिंग मध्ये महाळुंगे पोलीस चौकी गुन्हा रजि नंबर १९४९/२०२२ भा.द.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
महाळुंगे पोलीसांनी मयत चनजय याची मुले सुजित धनंजय बनसोडे, वय २२ वर्ष व अभिजित धनंजय बनसोडे, वय १८ वर्ष यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वडील धनंजय यांचे नागपुर येथील महिलेशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे पडीलांचा खुन करून पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केले असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत सदर गुन्हयात अटक करुन पुढील तपास चालू आहे.
सदर घडलेली घटना ही अतिशय गंभीर व हिंस्त्र स्वरुपाची असुन महाळुंगे पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन गुन्हा अतिशय कमी वेळात उघडकीस आणला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण दिमाग श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी पोलीस अंमलदार- राजु कोणकेरी, विनोद जाधव, चेतन मुंडे, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे यानी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील हे करीत आहेत