बालाजी शिंदे, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी-चिंचवड:- “सरकारी काम चार दिवस थांब” अशी मराठी मध्ये एक म्हण आहे. या म्हणीवरून सरकारी अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत समजू शकते. असच चित्र सध्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेतील बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही. अशा वर्तवणुकीमुळे पालिकेचे कार्यालयीन कामकाज विल्कळीत होत आहे, या पार्श्वभूमीवर आयुक्ताने हे आदेश दिले आहेत. याबाबत परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे.
नियमित उपस्थिती पडताळून पाहण्यासाठी हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करावी. पालिकेचा गणवेश तसेच ओळखपत्रे परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करावी. कार्यालयीन नोंदवही अद्ययावत न ठेवल्यास तसेच कामात टाळाटाळ केल्यास कारवाई करावी. सर्व टपाल तातडीने निकाली काढावे. ओळखपत्र तसेच प्रवेशिका असल्याशिवाय पालिकेत प्रवेश देऊ नये. कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे. सेवानिवृत्ती प्रकरणांमध्ये संबंधित विभागाने ८ महिने आधी प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी, आदी विविध सूचना आयुक्तांनी या परिपत्रकात केल्या आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348