महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ओझर खुर्द:- ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द ग्रापंचायत वर दणदणीत यश मिळवून सरपंच पद आणि सत्ता मिळवून आणलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या पदस्थापना करण्यात आली.
दिनांक ३० रोजी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने सौ. गिरिजाताई अण्णासाहेब साबळे, यांची सरपंच पदी नियुक्ती करण्यात आली. व श्री. दगडू काशिनाथ शेपाळ यांची उपसरपंच पदी नियुक्ती करण्यात आली.
सौ. शुभांगी अरुण कदम, सौ. चांदणी दिलीप कदम, सौ. कविता शिवाजी शिंदे, श्री. बकचंद दत्तू साबळे. याची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ओझर गाव मधील ग्रामस्थ, ग्रामसेवक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.