✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.30:- महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि.2 ते 12 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या निमित्याने नागपूर येथून पुणे पर्यंत क्रीडा ज्योत काढण्यात आली आहे. या क्रीडा ज्योतचे जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर स्वागत करण्यात आले.
नागपूर येथून राज्य क्रीडा मार्गदर्शक योगेंद्र खोब्रागडे, ललीत सुर्यवंशी, पवन भोसले, ऋषीकेश लवठे व इरशाद सागर यांच्या पथकासह क्रीडा ज्योतचे आगमन जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकूरवाडे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्ह्यातील वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक व ॲथलेटीक्स असोसिएशनचे सचिव रमेश बुटे यांनी क्रीडा ज्योतचे स्वागत केले.
यावेळी सेपक टकरा संघटनेचे सचिव विनय मुन, क्रीडा मार्गदर्शक संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, क्रीडा अधिकारी विश्वास बोकडे, रवि काकडे, सागर राऊत, जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक व अवधेश क्रीडा मंडळाचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा ज्योत वर्धा शहरात फिरवण्यात आली व दुपारी 1 वाजता पुणे करीता रवाना झाली, आहे.