✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समूदपूर:- तालुक्यातील चोरी रिपोर्ट वरुण फिर्यादी पुंडलिक शंकरराव गलांडे,व त्यांची पत्नी असे दोघेही घटनेदिवशी त्यांचे मौजा हिरडी शिवार येथे असलेल्या शेतामध्ये कामाला गेले असता त्यावेळी त्यांचे घरी कोणीही नव्हते व त्यांनी घराचे दाराला कुलुप लावले होते. शेतीचे काम आटोपुन सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास फिर्यादी पुंडलिक शंकरराव गलांडे व त्यांची पत्नी असे दोघेही घरी आले असता, त्यांना दाराचा फक्त कोंडा लावुन दिसला, त्यामुळे त्यांनी घरात जावुन पाहणी केली असता, स्वयंपाक रूममध्ये असलेल्या कपाटातील कपडे, साड्या व वस्तु सर्वत्र अस्ताव्यवस्थ पडुन असल्याचे दिसले व कपाटाचे लॉकर उघडे दिसले. त्यांनी लॉकरची पाहणी केली असता, त्यात ठेवुन असलेले नगदी 5,000 रू व घड्याळ किं 800 रू. दिसले नाही. त्यावरून त्यांचे राहते घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दाराला लावुन असलेले कुलुप तोडुन, घराचे आत प्रवेश करून कपाटातील नगदी 5,000 रू व एक घड्याळ किं. 800 रू. असा एकुण 5,800 रू. चा माल चोरून नेल्याचे समजुन आल्याने, त्यांनी पोलीस स्टेशनला येवुन, घटनेबाबत रिपोर्ट दिली. फिर्यादीचे रिपोर्टवरून अज्ञात आरोपी विरूध्द सदरचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
सदर गुन्ह्याचे तपासात गोपणीय माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार विशाल गायकवाड रा. मनीश नगर, कैकाडी नगर नागपुर, ह.मु. संत चोखोबा वार्ड यास ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले नगदी 5,000 रू पैकी 2,300 रू व एक घड्याळ किं. 800 रू. असा जु.किं. 3,100 रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. अटक आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्ह्यात त्याचे आणखी दोन साथीदार नामे कैलाशसिंग भादा रा. सिखपुरा, संत चोखोबा वार्ड हिंगणघाट व मंगलसिंग टाक ,रा. सिखपुरा, संत चोखोबा वार्ड हिंगणघाट यांचा सहभाग असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी तिघांनी मिळुन यापुर्वी सुध्दा संगणमताने चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन, त्यांना गुन्ह्यात अटक करून पुढील तपास केला असता, विचारपुस दरम्यान आरोपी नामे कैलाशसिंग भादा याने कबुली निवेदन दिले कि, त्यांनी तिघांनी मिळुन मौजा शेडगाव येथील एक मोटर सायकल व मौजा परडा येथील शेत शिवारातुन एक मोटर पंपची चोरी केली आहे. त्यावरून त्यांचे ताब्यातुन, एक मोटर सायकल व मोटर पंप जप्त करून तिन्ही आरोपीतांना न्यायालयात पेश करून, दि. 02 जानेवारी पावेतो पि.सी.आर प्राप्त करून पुढील तपास दरम्यान आरेापीतांना सखोल विचारपुस केली असता, त्यांनी आणखी दोन मोटर सायकल चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने, त्या मोटर सायकल सुध्दा जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्याचे तपासात तिन्ही आरोपीतांचे ताब्यातुन तीन मोटर सायकल, घरफोडीतील मुद्देमाल व एक मोटर पंप असा एकुण 1,20,700 रू. चा माल जप्त करण्यात आल असुन पो.स्टे. समुद्रपुर येथील तीन गुन्हे उघड करण्यात आले. ईतर दोन मोटरसायकल चोरी बाबत दाखल गुन्ह्याचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे, यांनी केली.

